आमच्याविषयी
Who we are
We are a team of change-makers who believe that every helping hand can raise a child and create a better future for them.
We started extending help to needy children and youth who were eager to study and work for a better life. This moment intensified when we found that there were many such underprivileged children who needed help with food, shelter and education. Our team expanded and we spread out in different regions to make sure we cover all possible areas and help as many children as possible.
We now run shelter homes, schools and a reasonable mess that helps such needy young people. We also have our helpline offices spread throughout the country so one can approach us anytime they need help.
Our approach
Our Mission
Our mission is to make sure all young people and children get all the support they need, when they need it, no matter what it is.
Whether it is a reassuring conversation, financial help, education, professional training, or simply the assurance that they are not alone, we will make sure that everyone gets support that meets them where they’re at as quickly as possible.
Our Vision
We want to build a world where no child or youth feels alone and gets every possible help they need as soon as possible.
Our Partners






Our numbers that speak
स्व ते सोबतपर्यंत चा आमचा प्रवास
इच्छेनुसार वैद्यकीय शिक्षणाचे हे सेवेचे क्षेत्र मला पदवी अभ्यासासाठी मिळाले; मात्र या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजजीवनाच्या सुदृढतेसाठी कसा करता येईल, हा विचार मनात सतत येत असे.
दरम्यान, डॉ. अविनाश सावजी यांचा ‘सेवांकुर’ उपक्रम आणि ज्यांच्याशी मी दीर्घकाळापासून जोडला गेलो आहे व जिथे मी स्थिरावलो, असे डॉ. अभय बंग (नायना) आणि डॉ. राणी बंग (अम्मा) यांनी ‘सर्च’ (SEARCH) संस्थेमार्फत सुरू केलेला ‘निर्माण’ हा उपक्रम!
दरम्यान, अनेक शिक्षक, मित्र आणि काही क्षणांसाठी भेटलेल्या सहकाऱ्यांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या प्रवासात डॉ. रोहित गणोरकर, डॉ. हर्षा नन्नावरे, डॉ. सौरभ धोपटे अशा अनेकांशी गाठ पडली; या सर्वांचा उल्लेख करणे शक्य नसले तरी, हे सर्वजण आयुष्याचे सोबती म्हणून भेटले.
आज आम्ही ज्या स्वप्नाबद्दल बोलतोय, त्या स्वप्नाचा पाठलाग खूप पूर्वीच सुरू झाला होता. काय होते ते प्रश्न?
आरोग्य: उपलब्ध असूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आरोग्य सुविधा.
शिक्षण: उपलब्ध आणि सर्वज्ञात असलेली, मात्र योग्य मार्गदर्शकाअभावी आणि पैशांच्या कमतरतेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांपासून दूर राहिलेली शैक्षणिक माहिती व करिअर मार्गदर्शन.
रोजगार: रोजगाराच्या उपलब्धतेअभावी निर्माण झालेला कौटुंबिक ताणतणाव आणि सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा.
व्यसन: “परिस्थिती खराब आहे” असे म्हणून वाढीस लागलेले आणि योग्य दिशा देणारे कोणी नसल्यामुळे जडलेले व्यसन (दारू, तंबाखू आणि इतर).
रोजच्या जीवनात हे चित्र सर्वत्र दिसत असताना मन अस्वस्थ व्हायचे आणि आजही होते. डॉक्टर व्हावेसे वाटले, त्यामुळे आरोग्यक्षेत्राने नेहमीच खुणावले; मात्र आरोग्य म्हणजे केवळ ‘शारीरिक आरोग्य’ का? हा मोठा प्रश्न तेव्हाही पडायचा आणि आजही पडतो. आज अभ्यास करताना लक्षात येते की, आरोग्याचा विचार हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पूर्वी केवळ शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित होता, मात्र आता तो बहुआयामी झाला आहे. यामध्ये मानसिक आरोग्य, नैतिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य यांचाही समावेश होतो.
समाजजीवनातील विविध बाबींचा आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. म्हणूनच, जेव्हापासून हे प्रश्न पडू लागले, तेव्हापासून ‘संपूर्ण आरोग्याच्या’ ध्येयाने, मर्यादित का होईना, पण आपल्याला काय काय करता येईल, याचा मी सातत्याने विचार करत आलो आहे.
समाजाचे ‘अपूर्ण आरोग्य’ ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे. नेमकेपणाने सांगायचे झाले तर, वर उल्लेख केल्याप्रमाणे काही बाबी वगळता शारीरिक, मानसिक, नैतिक आणि सामाजिक आरोग्य अशा चार विभागांत त्याची विभागणी करता येईल. हे चार मुख्य मुद्दे असले तरी त्यांचेही अनेक पैलू (कंगोरे) आहेत. तरीही, नेमकेपणाने या चारही बाबींवर काम करणारे आमचे उपक्रम म्हणजे:
१. उत्तम आरोग्य सुविधा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, ज्या सुदृढ शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
२. उत्तम नैतिक शिक्षण, आरोग्य शिक्षण, लैंगिक शिक्षण आणि व्यसनमुक्ती; जे एक मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि नैतिक मूल्यांनी समृद्ध समाज घडवण्यास मदत करेल.
३. आपल्या परिसरात रोजगाराची उपलब्धता निर्माण करणे; ज्याचा थेट संबंध कुटुंबाच्या अर्थकारणाशी आणि रोजच्या उदरनिर्वाहाशी (रोजीरोटीशी) आहे.
जे लौकिक अर्थाने समाजाची ‘सिद्धता’ दर्शवते. त्यामुळेच, संपूर्ण आरोग्याच्या दृष्टिकोनातून काम करताना ‘आरोग्य-शिक्षण-रोजगार’ या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. जिथे अडचणींचे डोंगर आहेत, तिथे मदतीचा आणि संधीचा ‘आडवा पूल’ बांधण्याची गरज आहे, हे विचार सातत्याने मनात घोळत राहिले.
हा विचार आणि मर्यादित समुदायासाठी का होईना, पण हे स्वप्न उराशी बाळगून मी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रवास करत राहिलो. अर्थात, सुरुवातीला असलेला आत्मविश्वासाचा अभाव, आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक मर्यादांमुळे संघर्ष करावा लागला. माहिती आणि अनुभवाअभावी काही ठिकाणी वेळही वाया गेला. मात्र, मनात असलेला ‘पूर्वनिश्चय’ आणि जिद्दीच्या जोरावर मी पुढे सरकत राहिलो आणि त्याच संघर्षाने मला आज इथपर्यंत आणले आहे.

मला पडणारे प्रश्न रोहितलाही पडत होते. तो देखील त्याच्या स्तरावर, त्याला तीव्रतेने जाणवणाऱ्या प्रश्नांवर विचार करत होता. हे सर्व सुरू असताना, दुसरीकडे मळलेल्या वाटेवरचा आणि अनेकांसाठी आवश्यक असलेला ‘पी.जी.’चा (Post-Graduation) प्रश्न उभा होता. मात्र, “मेडिकलनंतर पी.जी. केल्याने हे प्रश्न सुटतील का?” हा एक मूलभूत प्रश्न होता. त्याऐवजी “आधी सामाजिक गरज समजून घेऊ आणि त्यानुसार आवश्यक ते शिक्षण पुढे घेऊ,” हा दुसरा विचार मनात होता. अखेर, समाजाची गरज हीच ‘कार्यकारणमीमांसा’ ठरवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो.
आता आम्ही दोघे मिळून विचार करत होतो. आमच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने, कामाच्या विविध कार्यप्रणाली आम्ही अभ्यासत होतो. यादरम्यान १. शासकीय, २. खासगी, ३. सोसायटी, ४. संस्था आणि ५. युनियन इत्यादींच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधील कार्यकर्त्यांना भेटण्याचा आणि त्यांचे काम जवळून पाहण्याचा आम्हाला योग आला.
मात्र, हे सर्व करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने आणि हे कार्य सिद्धीस नेणाऱ्या व्यक्तींच्या व्यावहारिक अडचणी अनुभवण्यासाठी व त्यांना समजून घेण्यासाठी, आम्ही दोघांनी विविध संस्थांमध्ये काम केले.
पुढे स्वप्नांना मूर्त रूप कुठे द्यायचे, याचा विचार करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, सर्वप्रथम ज्या जमिनीत आपण वाढलो, जिथे आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा परिपोष झाला, त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी तिथे काम करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हे स्मरून आणि समाज अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही दोघेही आपापल्या जिल्ह्यात कामावर रुजू झालो. मी आरोग्यवर्धिनी केंद्र, अंतरगाव (ता. सावली, जि. चंद्रपूर) आणि डॉ. रोहित आरोग्यवर्धिनी केंद्र, शिरजगाव कसबा (ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) येथे शासकीय सेवा प्रदान केली.
शासकीय सेवेतील अनुभवानंतर, स्थानिक ठिकाणची गरज आणि परिस्थिती पाहता आमचा निर्धार अधिक पक्का झाला. शासकीय सेवेतून ध्येय साध्य करणे का कठीण वाटले, हे आपण भेटल्यावर सविस्तर बोलूच; मात्र तो मार्ग नकोसा वाटल्याने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेवाकार्य करावे, हे निश्चित झाले आणि आमचा एकत्र प्रवास सुरू झाला.
दवाखाना सुरू केला त्याच वर्षी माझे लग्न झाले आणि डॉ. जानकी यांच्या रूपाने या कार्यास मोठे पाठबळ लाभले. ग्रामीण जीवन जवळून पाहिलेल्या डॉ. जानकी यांना सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा घरातूनच मिळाला होता. तरीही, गावातच राहून हे कार्य सिद्धीस न्यायचे, हा तिचा निर्णय आणि तिने दिलेले धैर्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. तिच्या या खंबीर पाठिंब्यामुळेच ‘जाणीव रुग्णालय’ कार्यान्वित होण्यास मोठी मदत झाली.
आमचे ध्येय
संपूर्ण आरोग्य : आरोग्य -शिक्षण -रोजगार
आजारी पडल्यावर दवाखान्यात जाऊन औषध घेतले पाहिजे किंवा मानसिक त्रास होत असल्यास मानसोपचारतज्ज्ञांकडे गेले पाहिजे, हे उमजण्यासाठी समाजात शिक्षणाची गरज आहे. शिक्षण हा जरी मूलभूत अधिकार असला, तरी तो मिळवण्यासाठी आणि आत्मसन्मानाने आरोग्य सेवा घेण्यासाठी हातात पैसा असणेही तितकेच आवश्यक आहे.
भरलेले पोट, हातात पुरेसे काम, आवश्यक नैतिक मूल्य शिक्षण, आरोग्य शिक्षण आणि लैंगिक शिक्षण या गोष्टी माणसाला ‘प्रतिबंधात्मक’ उपायांच्या दृष्टीने सज्ञान करतात. याच बाबी व्यक्तीमध्ये आवश्यक त्या आरोग्य सेवा घेण्याची मानसिक आणि नैतिक ताकद उभी करतात; म्हणूनच ‘संपूर्ण आरोग्य’ म्हणजे ‘आरोग्य-शिक्षण आणि रोजगार’ असा त्रिसूत्री सिद्धांत आम्ही मानतो.
‘आरोग्य-शिक्षण आणि रोजगार’ या संकल्पनेचा आमचा नेमका अर्थ काय, हे खाली उधृत केले आहे .
- उत्तम आरोग्य सुविधा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
- उत्तम नैतिक शिक्षण, आरोग्य शिक्षण, लैंगिक शिक्षण, व्यसनमुक्ती जे सुदृढ मानसिक समाज आणि नैतिक मूल्यांनी भरलेला समाज उभा करण्यास मदत करेल.
- नजीकच्या परिसरात रोजगार उपलब्धता करणे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजा भागविताना उत्तम शिक्षण व आरोग्य प्राप्त करण्यासाठी खर्च करण्याची ताकत हि रोजगारावर अवलंबून आहे. त्याचा उत्पन्नाशी सरळ संबंध आहे.
उद्दिष्ट्ये
लोकांना परवडेल अशा माफक दरात अत्यावश्यक आरोग्य सेवा देणारे सामुदायिक रुग्णालय चालवणे.
आपण कार्यान्वित करणार असलेल्या रुग्णालयापासून लांब असलेल्या, तसेच शासकीय सेवेपासून लांब व दुर्लक्षित असलेल्या गावांमध्ये सामुदायिक क्लिनिक सुरू करणे व चालवणे.
सामुदायिक रुग्णालयाच्या माध्यमातून विविध वैद्यकीय विद्याशाखांमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबीर उपलब्ध करून देणे (उदा. स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण, डोळ्यांचे विकार, कान-नाक-घसा, मानसिक रोग इत्यादी).
स्थानिक शाळांसोबत व गावस्तरावर नैतिक शिक्षण, लैंगिक शिक्षण, व्यसन तसेच करिअर मार्गदर्शन, व्यावसायिक शिक्षण यांबाबतचे उपक्रम घेणे.
स्थानिक जनजीवनाला पूरक रोजगारनिर्मिती करण्यास चालना देणे व संबंधित कार्यशाळा घेणे.
लोकभाषेमध्ये मासिक किंवा पाक्षिकाद्वारे आरोग्याच्या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.
आमची सुरुवात कशी झाली...
सोबत फाउंडेशन चंद्रपूर संस्थेचा ‘जाणीव रुग्णालय’ हा पहिलावहिला उपक्रम गेवरा बूज येथे १ जानेवारी २०२१ रोजी भाड्याच्या घरात सुरू झाला. जुने फर्निचर, १ जुनी चारचाकी गाडी, अडीच लाख रुपयांची औषधे व रुग्णालय उपयोगी साहित्य आणि सहा कार्यकर्ते इतक्या आधाराने उपक्रमाची सुरुवात झाली. श्री. आशिष जुआरे, डॉ. सौरभ धोपटे, श्री. राजेंद्र व सौ. माधुरी म्हस्के यांच्या आर्थिक सहकार्यातून हे शक्य झाले. ‘सर्च’ संस्थेच्या ‘निर्माण’ उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. सुरज म्हस्के यांना “कर के देखो” ही फेलोशिप हे काम उभे करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात आली. २०२५ पर्यंत चार वर्षे ही फेलोशिप देण्यात आली. यामुळे संस्थेला उभे राहायला मोठे बळ मिळाले. अगदी वर्षभरात १४,००० हून अधिक रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालय सुरू झाले होते. परिसरातील नागरिक घाबरलेले होते. त्याकरिता संशयित रुग्णांसाठी वेगळी ओपीडी घेत, परिसरातील शाळेमध्ये निदान झालेले व त्रास नसलेल्या रुग्णांसाठी देखभाल केंद्र संस्थेने चालवले. रुग्णालयाचा खर्च भागवण्यासाठी माफक फी आकारण्यात येते, त्यातून दवाखान्याचा खर्च भागवण्यात येतो. तसेच हितचिंतकांकडून प्राप्त होणाऱ्या देणगीमधून खर्चाची तूट भरून काढायला मदत झाली.
परिसरातील रुग्णसेवेची आवश्यकता लक्षात घेत २०२२ मध्ये प्रयोगशाळेचा विस्तार करण्यात आला. २०२३ मध्ये दंतचिकित्सा केंद्र उघडण्यात आले. हे केंद्र सुरू करण्यासाठी श्री. प्रियदर्शी मश्रुवाला व श्री. दिगंबर गुरपुडे यांनी आर्थिक मदत केली. डॉ. तरू जिंदाल (मुंबई) यांच्याकडून दंतचिकित्सा केंद्र कार्यरत करण्यासाठी डॉ. जानकी गुरपुडे यांना अर्थसहाय्य करण्यात आले.
आकस्मिक सेवेची गरज लक्षात घेऊन आम्हाला रुग्णांसाठी २४ तास देखरेखीची आवश्यकता भासू लागली. त्याकरिता जागेची मर्यादा होती. रोजीरोटीसाठी वऱ्हाडात स्थलांतरित झालेले श्री. दादाजी भोयर यांनी त्यांचे जुने घर आम्हाला उपलब्ध करून दिले. मित्रांच्या आर्थिक सहकार्यातून त्याची डागडुजी करून त्यामध्ये आकस्मिक सेवा केंद्र व पाच खाटांची सोय करण्यात आली. आकस्मिक प्रसूतीकरिता सोय करण्यात आली. हे सर्व जून २०२४ मध्ये सुरू झाले.
घेण्यात येणारी फी अगदीच माफक असल्याने त्यामध्ये संस्थेचा खर्च भागवणे कठीण जाते. रोटरी क्लब मुंबई, श्री. भालचंद्र गोखले, श्री. अभिजित जोगळेकर, श्री. संजय जोशी, श्री. प्रसन्ना तुपे, डॉ. प्रियांका थोरात, श्री. अरुण मविनकुर्वे (मुंबई), शबरी सेवा समिती (कर्जत), श्रीमती विद्यागौरी अनंत खरे यांनी केलेल्या उल्लेखनीय मदतीतून आम्हाला तूट भरून काढायला विशेष मदत झाली.
२०२५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून रुग्णालयाला रुग्णवाहिका, वॉटर कुलर, बेड व रुग्णालयात उपयोगी उपकरणे देण्यात आली, ज्यामुळे रुग्णसेवेचा विस्तार करायला मदत झाली.
दवाखाना चालवत असताना असे लक्षात आले की, या परिसरात लग्ने लवकर होतात. मुलींची खेळायची हौस राहून जाते. त्यामुळे संस्थेने २०२२ मध्ये प्रथमच महिलांसाठी कबड्डी व खो-खोचे आयोजन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता नियमित महिला व मुलींसाठी खेळ व डान्सच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर मुलांनी सुद्धा “आमच्यासाठी सुद्धा असा कार्यक्रम घ्या” अशी मागणी केली, तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा मागील दोन वर्षांपासून आयोजन केले जाते. रुग्णालयातील कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, अनेक हितचिंतक, देणगीदार सर्वांच्या सहकार्याने ४० हजारांहून अधिक रोगनिदान व उपचार आम्ही करू शकलो. रुग्णालयाचा पुढील प्रवास सुरू आहे.
आरोग्य सेवा
विशेष उपक्रम
नेत्र शिबिरे
सामुदायिक आरोग्य उपक्रम

संस्थापक
विश्वस्त व कार्यकारी मंडळ

डॉ. सुरज राजेंद्र म्हस्के
एम.बी.बी.एस
डॉ. सुरज राजेंद्र म्हस्के हे गेवरा बूज (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून, त्यांचे एम.बी.बी.एस.चे शिक्षण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून पूर्ण झाले आहे. त्यांनी फिरते आरोग्य पथक, आदिवासी आरोग्य विभाग, ‘सर्च’ (शोधग्राम), शहीद रुग्णालय (दल्लीराजहरा, छत्तीसगड) आणि कस्तुरबा हेल्थ सोसायटी (सेवाग्राम) येथे प्रशिक्षण घेतले व सेवा प्रदान केली. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतरगाव (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथेही त्यांनी सेवा दिली आहे. सध्या ते ‘जाणीव रुग्णालय’, गेवरा बूज येथे पूर्णवेळ मुख्य चिकित्सक म्हणून कार्यरत असून, संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत.
डॉ. जानकी दिगंबर गुरपुडे
बी.डी.एस
डॉ. जानकी दिगंबर गुरपुडे या गेवरा बूज (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून, त्यांचे बी.डी.एस.चे (B.D.S.) शिक्षण कालमेघ डेंटल कॉलेज, नागपूर येथून पूर्ण झाले आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नागपूर येथील खासगी रुग्णालयांमध्ये दंतचिकित्सा सेवा प्रदान केली. सध्या त्या ‘जाणीव रुग्णालय’, गेवरा बूज येथे दंतचिकित्सक म्हणून कार्यरत असून, संस्थेच्या संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत.
डॉ. रोहित रामेश्वर गणोरकर
एम.बी.बी.एस, एम.डी ( मानसिक आरोग्य -तृतीय वर्ष )
डॉ. रोहित रामेश्वर गणोरकर हे करजगाव (ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) येथील रहिवासी असून, त्यांचे वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून पूर्ण झाले आहे. त्यांनी मानसिक आरोग्य विभाग, ‘सर्च’ (शोधग्राम) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरजगाव कसबा येथे वैद्यकीय सेवा प्रदान केली आहे. सध्या ते मुंबईत कार्यरत असून, नायर रुग्णालय येथे मानसिक आरोग्य विभागात पदव्युत्तर शिक्षणाचे (MD Psychiatry) द्वितीय वर्ष पूर्ण करत आहेत.

डॉ. हर्षा वसंतराव नन्नावरे
एम.बी.बी.एस, एम.डी ( सामाजिक आरोग्य विभाग -प्रथम वर्ष )
डॉ. हर्षा वसंतराव नन्नावरे या लाखनी (जि. भंडारा) येथील रहिवासी असून, त्यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे. वैद्यकीय शिक्षणादरम्यान त्यांनी विविध सेवा शिबिरांमध्ये सहभाग घेतला. तसेच त्यांनी ‘निर्माण’ उपक्रमाचा भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, गट्टा; प्राथमिक आरोग्य केंद्र, रांगी; फिरते रुग्णालय, आदिवासी आरोग्य विभाग आणि ‘सर्च’ (गडचिरोली) येथे सेवा प्रदान केली आहे. सध्या त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे सामाजिक वैद्यकशास्त्र विभागात (Community Medicine) प्रथम वर्ष एम.डी.चे शिक्षण पूर्ण करत आहेत.

कु.रश्मी राजेंद्र म्हस्के
एम.एस.सी( मायक्रोबायोलोजी )
कु. रश्मी राजेंद्र म्हस्के या नागपूर येथील रहिवासी असून, त्यांचे सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) व प्राणीशास्त्र (Zoology) या विषयांत एम.एस्सी. (M.Sc.) पूर्ण झाले आहे. सध्या त्या सेवादल महिला महाविद्यालय, नागपूर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
डॉ. सौरभ रविंद्र धोपटे
एम.बी.बी.एस
डॉ. सौरभ रवींद्र धोपटे हे धारणी (जि. अमरावती) येथील रहिवासी असून, त्यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी ग्रामीण रुग्णालय, हिंगणघाट येथे आरोग्य सेवा प्रदान केली आहे. सध्या ते दिल्ली येथे असून, एका खासगी रुग्णालयात सेवा देत आहेत.

प्रा. रीना प्रमोद दाजगाये
एम.ए( इतिहास , राज्यशास्त्र ), बी.एड
सौ. रीना प्रमोद दाजगाये या उसरपार चक (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून, त्यांचे राज्यशास्त्र व इतिहास या विषयांत एम.ए. (M.A.) पूर्ण झाले आहे. सध्या त्या इंदिरा गांधी विद्यालय, पालेबारसा येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.

श्री.गुरुदेव ऋषिदेव शेंडे
शेतकरी
श्री. गुरुदेव ऋषिदेव शेंडे हे स्थानिक शेतकरी असून, त्यांनी बँकेत काही वर्षे काम केले आहे. सध्या ते संस्थेत कार्यालय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

श्री.मयूर अशोकराव बारापात्रे,
बी.कॉम
श्री. मयूर अशोकराव बारापात्रे हे अंतरगाव (ता. सावली, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून, त्यांचे बी.कॉम.पर्यंतचे (B.Com.) शिक्षण पूर्ण झाले आहे. ते एक स्थानिक सक्रिय सहकारी असून, त्यांचा स्वतःचा किराणा मालाचा व्यवसाय आहे.

डॉ. पराग विजयराव राउत,
एम.बी.बी.एस, डी.एन.बी( फ्यामिली मेडिसिन )
डॉ. पराग राउत हे वर्धा येथील रहिवासी असून, त्यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी तमिळनाडू येथील उडण्चात्रण येथून डी.एन.बी. (फॅमिली मेडिसिन) पूर्ण केले. शहीद रुग्णालय (दल्लीराजहरा) आणि जिल्हा रुग्णालय (वर्धा) येथे त्यांनी वैद्यकीय सेवा प्रदान केली असून, सध्या ते वर्धा येथे ‘कुटुंब क्लिनिक’ हे आपले खासगी रुग्णालय पूर्णवेळ सांभाळत आहेत.

डॉ. अमित बाबासाहेब ढगे
एम. बी.बी.एस, एम.पी.एच
डॉ. अमित ढगे हे बार्शी (जि. सोलापूर) येथील रहिवासी असून, त्यांनी डॉ. वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी त्रिवेंद्रम (केरळ) येथील अच्युत मेनन सेंटर फॉर हेल्थ सायन्स स्टडीज, श्रीचित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट येथून एम.पी.एच.चे (MPH) शिक्षण पूर्ण केले. त्यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील देचलीपेठा व जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवा प्रदान केली आहे. तसेच त्यांनी नॅशनल हेल्थ सिस्टीम रिसोर्सेस सेंटर (NHSRC) येथेही कार्य केले आहे. छत्तीसगड राज्यातील दल्लीराजहरा येथील ‘शहीद रुग्णालय’ आणि ‘जन स्वास्थ्य सहयोग’ (गनियारी, बिलासपूर) येथे त्यांनी वैद्यकीय सेवा दिली असून, सध्या ते तेथेच कार्यरत आहेत.
आमचे मार्गदर्शक



कार्यकारी संचालक

डॉ सुरज म्हस्के
एम.बी.बी.एस

डॉ जानकी गुरपुडे
बी.डी.एस
प्रशासकीय समिती

कु.राहुलशाह चक्रवीरशाह मडावी
व्यवस्थापकीय प्रमुख

श्री.गुरुदेव ऋषिदेव शेंडे
कार्यालय प्रमुख

श्री.मयूर अशोकराव बारापात्रे
निरीक्षक
जाणीव रुग्णालय टीम सदस्य

कु.श्रेयश गणोरकर
औषध निर्माण अधिकारी

कु.प्रतिक्षा जेंगठे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ

कु.रागिणी सहारे
आरोग्यसेविका

श्रीमती. सुनिता नगारे
सहाय्यक आरोग्यसेविका

सौ.गीता चौधरी
सहाय्यक आरोग्यसेविका

सौ.अनिता मारभते
मदतनीस

कु.विक्रम कावळे
वाहनचालक

कु.गौरव मंगर
सामुदायिक आरोग्य प्रकल्प समन्वयक
कु. तुषार चुधरी
रुग्णालय व्यवस्थापक
कु. सुदिप्ता मुनघाटे
सामुदायिक आरोग्य व्यवस्थापक
सौ.हृतुगंधा पाटील
मिडिया व डेटा कन्सलटंट
कु. सारिका कुरनुरकर
लेखापरीक्षक
आमचा प्रवास
2020-स्थापना
- नोव्हेंबर: सोबत फाउंडेशन नोंदणी
- जाणीव रुग्णालय सुरुवात
- बाह्यरुग्ण सेवा
2022-विस्तार
- जानेवारी: दंतरोग विभाग सुरू
- प्रयोगशाळा सुविधा
- ECG उपलब्ध
2024-मोठी उडी
- जून: आंतररुग्ण विभाग सुरू
- नेत्र शिबिरे (३ ठिकाणी)
- गाव पातळीवर ५ उपचार केंद्रे
- क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
2025-नवीन संधी
- जानेवारी: आवळगाव उपकेंद्र
- विस्तारित सेवा
- अधिक गावांचा समावेश






Certified Products
Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet