Sobat Foundation

1

आमच्याविषयी

जाणीव रुग्णालय

रोज सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत बाह्यरुग्ण सेवा
गुरुवार बंद

बाह्यरुग्ण सेवा

रविवार: उच्च रक्तदाब व शुगर विशेष ओपीडी
मंगळवार: गरोदर माता तपासणी विशेष ओपीडी

उपलब्ध सेवा

  1. डेंग्यू, टायफॉइड, स्क्रब टायफस, कोरोना, मेंदूज्वर, मलेरिया आणि व्हायरल फिवरचे निदान व उपचार.

  2. श्वसनरोग, न्यूमोनिया, टीबी (क्षयरोग) निदान व उपचार.

  3. उलटी, जुलाब (हगवण), मळमळ, भोवळ, अपचन, बद्धकोष्टता आणि पोटदुखीचे निदान व उपचार.

  4. खाज, खरुज, गजकर्ण, खसू, एक्झिमा आणि गोवरचे निदान व उपचार.

  5. सर्पदंश, विंचू दंश, श्वानदंश (कुत्रा चावणे), मधमाशी किंवा कीटक चावणे, तसेच रानडुक्कर किंवा वाघ यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात प्राथमिक उपचार, लस आणि संदर्भ सेवा उपलब्ध.

  6. बी.पी. (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह), लकवा, हृदयरोग आणि किडनीच्या विकारांचे निदान व उपचार.

  7. थायरॉईडशी संबंधित आजारांचे निदान व उपचार.

  8. कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी आणि संधिवातावर प्रभावी निदान व उपचार.

  9. सिकलसेल, रक्ताचे विकार, कुष्ठरोग आणि हत्तीपाय निदान व उपचार.

  10. गरोदर व स्तनदा मातांची तपासणी, पाळीचे विकार, वंध्यत्व निदान, उपचार व संदर्भ सेवा.

  11. चिंता, निद्रानाश (झोप न लागणे), मानसिक ताणतणाव आणि व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व उपचार.

  12. दारू सोडण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार.

  13. डोकेदुखी (मायग्रेन), कानातून पू येणे, डोळे येणे, मोतीबिंदू, काचबिंदू निदान आणि स्वस्त दरात शस्त्रक्रियेसाठी संदर्भ सेवा.

  14. रस्ता अपघात किंवा इतर आपत्कालीन स्थितीसाठी आकस्मित सेवा उपलब्ध.

उपलब्ध सुविधा

  1. ईसीजी तपासणी (ECG)

  2. नेब्युलायझर (वाफारा) सुविधा

  3. बाळाचे ठोके मोजण्याची (Fetal Monitoring) व्यवस्था

  4. रक्त व लघवी तपासणीकरिता प्रयोगशाळा सुविधा

  5. डे-केअर सेंटर

  6. रुग्ण भरतीची व्यवस्था

  7. ऑक्सिजन सुविधा

  8. स्वस्त दरात जेनेरिक औषधी सुविधा

  9. रुग्णवाहिका (Ambulance) सुविधा

दंतचिकित्सा सेवा

रोज सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत
गुरुवार बंद

उपलब्ध सेवा

  1. दंत व मुखरोग तपासणी

  2. दातांचा क्ष-किरण (X-Ray)

  3. दात साफ करणे (Scaling)

  4. दातांमध्ये चांदी, कॉम्पोझिट व सिमेंट भरणे (Filling)

  5. दात किंवा दाढ काढणे

  6. दातांच्या नसेचे उपचार (Root Canal Treatment – RCT)

  7. दातांची कवळी बसवणे

  8. लहान मुलांची दंतचिकित्सा (Pediatric Dentistry)

  9. फिक्स आणि रिमूव्हेबल दात बसवणे

  10. हिरड्यांचे उपचार

  11. दंत, मुख क्षयरोग आणि मुख कर्करोग निदान

डे केअर व आकस्मिक सुविधा

  1. डे-केअर आणि ड्रेसिंग व्यवस्था

  2. चोवीस तास (२४/७) आकस्मिक सेवा उपलब्ध

  3. आपत्कालीन प्रसूतीची व्यवस्था

  4. २४ तास देखरेखीची व्यवस्था

प्रयोगशाळा सुविधा

  1. हेमॅटोलॉजी: सी.बी.सी. (CBC), ई.एस.आर. (ESR), हिमोग्लोबिन, सिकलसेल तपासणी.

  2. बायोकेमिस्ट्री तपासणी: किडनी फंक्शन टेस्ट (KFT), रक्तातील चरबीचे प्रमाण (Lipid Profile), लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT), कावीळ तपासणी, एस.जी.पी.टी. (SGPT), एस.जी.ओ.टी. (SGOT), अमायलेज (Amylase), लायपेज (Lipase), सी.आर.पी. (CRP).

  3. मायक्रोस्कोपी तपासणी: क्षयरोग (TB), फायलेरिया (हत्तीपाय), कुष्ठरोग आणि लघवीची सूक्ष्म तपासणी.

  4. रॅपिड किट तपासणी: मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, स्क्रब टायफस, शुगर (Diabetes), गर्भनिदान तपासणी (Urine Pregnancy Test), एच.आय.व्ही. (HIV), एच.बी.एस.ए.जी. (HBsAg), व्ही.डी.आर.एल. (VDRL), हिपॅटायटीस-सी.

  5. विशेष तपासण्या: HbA1C (तीन महिन्यांची शुगर), Trop-I (हृदयरोग तपासणी), D-Dimer, TSH (थायरॉईड).

नेत्र तपासणी सुविधा

  1. महिन्यातून दोन वेळा नेत्रतपासणी अधिकाऱ्यांकडून तपासणी.

  2. दर तीन महिन्यांनी नेत्रशल्य चिकित्सकांकडून तपासणी.

  3. वार्षिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.

रुग्णवाहिका

  1. २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध 
  2. रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था 

आरोग्य सेवा

रुग्णसेवा
0 +
प्रयोगशाळा तपासण्या
0 +
दंतरुग्ण उपचार
0 +
ECG तपासण्या
0 +

सामुदायिक आरोग्य उपक्रम

  1. परिसरातील आकापूर, करोली, बोरमाळा टोली, डोंगरगाव आणि मेहा या गावांमध्ये संस्थेतर्फे ‘आरोग्य सोबती’ म्हणून प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत गावात मोफत ताप, सर्दी, खाज, उलटी आणि जुलाब (हगवण) यांसारख्या आजारांवर प्राथमिक उपचार केले जातात.

  2. आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधून मोफत सल्ला व संदर्भ सेवा (Referral Service) प्रदान केली जाते.

  3. गर्भवती महिलांची व सहा महिन्यांपर्यंतच्या बालकांची दरमहा मोफत तपासणी केली जाते.

  4. गावातील वयोवृद्ध व गरजू रुग्णांना दवाखान्यात आणण्यासाठी, ज्यांच्याकडे सोय नाही, त्यांच्याकरिता ठराविक दिवशी गावातून सवलतीच्या दरात वाहन व्यवस्था उपलब्ध आहे.

सामुदायिक आरोग्य उपक्रम

आरोग्य सोबती मार्फत उपचार
0 +
गरोदर माता तपासणी
0 +
स्तनदा माता तपासणी
0 +

विविध आरोग्य शिबिरे

  1. नेत्रतपासणी तसेच मोतीबिंदू व काचबिंदू निदान शिबीर.

  2. सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया (Operation) सुविधा.

  3. निवडक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया आणि नेण्या-आणण्याची (वाहन) सुविधा.

  4. शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ यांची विशेष ओपीडी.

विशेष उपक्रम

नेत्र शिबिरे

नेत्र तपासणी
0 +
चष्मे वितरण
0 +
मोतीबिंदू शस्त्रक्रिया
0 +
मानसिक आरोग्य शिबीर
0 +
कान नाक घसा शिबीर
0 +

किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

  1. वयात येणाऱ्या मुला-मुलींकरिता विशेष कार्यशाळा.

  2. शाळाबाह्य मुलांसाठी शैक्षणिक व कौशल्य विकास कार्यशाळा.

एकूण कार्यशाळा
0 +
एकूण मुलांचा सहभाग
0 +

क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

  1. परिसरातील नागरिकांसाठी वर्षातून एकदा क्रीडामहोत्सव: कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, गोळाफेक आणि मॅरेथॉन या खेळांची मेजवानी तसेच लोकनृत्याचे सादरीकरण.

  2. ‘एक गाव, एक संघ’ ही संकल्पना: गावातील प्रत्येकास खेळाची संधी मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश.

  3. स्थानिक लोकसहभागातून विविध उपक्रम.

  4. अविवाहित (मुले व मुली) तसेच विवाहित (स्त्रिया व पुरुष) गटांसाठी विशेष प्रोत्साहन.

  5. पारितोषिक म्हणून शैक्षणिक व गृहउपयोगी वस्तूंचे वाटप.

  6. प्रत्येक सहभागी व्यक्तीस सहभाग प्रमाणपत्र.

उपक्रमाचे वर्ष
0 +
एकूण गावांचा सहभाग
0 +
एकूण टीमचा सहभाग
0 +
एकूण खेळाडूंचा सहभाग
0 +

आमचा प्रवास

2020-स्थापना

  • नोव्हेंबर: सोबत फाउंडेशन नोंदणी
  • जाणीव रुग्णालय सुरुवात
  • बाह्यरुग्ण सेवा

2022-विस्तार

  • जानेवारी: दंतरोग विभाग सुरू
  • प्रयोगशाळा सुविधा
  • ECG उपलब्ध

2024-मोठी उडी

  • जून: आंतररुग्ण विभाग सुरू
  • नेत्र शिबिरे (३ ठिकाणी)
  • गाव पातळीवर ५ उपचार केंद्रे
  • क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

2025-नवीन संधी

  • जानेवारी: आवळगाव उपकेंद्र
  • विस्तारित सेवा
  • अधिक गावांचा समावेश

Rated 5 out of 5
Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Mila Kunit

Certified Products

Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet

We Deal With Various Quality Organic Products!