Sobat Foundation

1

सोबत फाउंडेशन चंद्रपूर

नीतीपूर्ण संघर्ष समतेकरिता
सर्वांसाठी संपूर्ण आरोग्य : वैद्यानिक निकषांवर आधारित, पोहचता येईल एवढ्या अंतरात व परवडेल अशा दरात, दर्जेदार आरोग्य सेवा.

आमच्याविषयी

सोबत फाउंडेशन, चंद्रपूर ही एक सामाजिक संस्था असून 'संपूर्ण आरोग्य' हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. “जाणीव रुग्णालय” हा संस्थेचा पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प जानेवारी २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गेवरा बूज. या गावी भाड्याच्या घरात सुरू करण्यात आला. गेवरा बूज हे गाव १४०० लोकवस्तीचे असून जिल्हा मुख्यालयापासून ११० किमी अंतरावर आहे. सावली, ब्रह्मपुरी व सिंदेवाही ही तालुक्याची ठिकाणे अनुक्रमे ३५, ५० आणि ५० किमी अंतरावर आहेत. जवळचे प्रमुख आरोग्य केंद्र गडचिरोली हे ४० किमी अंतरावर असून, अद्ययावत सुविधा असलेले नागपूर १७५ किमी अंतरावर आहे.

वैनगंगेच्या पश्चिम तीरावर वसलेले हे गाव सावली आणि ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात येते. मुख्यत्वे धान पिकावर अवलंबून असलेले इथले जनजीवन अत्यंत अल्पभूधारक आहे. धान पिकास योग्य भाव नसल्याने, रोजीरोटीसाठी इथल्या नागरिकांना वर्षातील बहुतांश काळ स्थलांतर करावे लागते.

जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त परिसरात कोणतीही खासगी किंवा तत्सम आरोग्य व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी, लोकांना आजही वैदू तसेच बोगस डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. वाघ व इतर वन्यप्राण्यांची दहशत आणि वाहतुकीच्या तुटपुंज्या सोयींमुळे, दिवसा व सायंकाळी प्रवास करणे अत्यंत अवघड असते.

स्थलांतरामुळे कुटुंब आणि समाजव्यवस्था ढासळत असून, त्याचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत आहेत. यातूनच व्यसनाधीनता, मधूनच शाळा सोडणे (गळती), गुन्हेगारी, बालविवाह, कुमारवयीन मातांचे प्रश्न, नैराश्य आणि मानसिक अस्थैर्य यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.

‘जाणीव रुग्णालय’ या सर्व प्रतिकूल परिस्थितीत रुग्णसेवेचे व्रत घेऊन मागील साडेचार वर्षांपासून उभे आहे. सावली, ब्रह्मपुरी व सिंदेवाही तालुक्यातील ५० गावांसाठी ‘संपूर्ण आरोग्य’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे रुग्णालय कृतीशील असून सदैव कटिबद्ध आहे.

आकडेवारी

मागील पाच वर्षांच्या प्रवासातील काही प्रमुख आकडेवारी

एकूण आरोग्यसेवा घेणारी गावे
0 +
एकूण रुग्ण तपासणी
0 +
एकूण आकस्मिक उपचार
0 +
एकूण प्रयोगशाळा तपासण्या
0

आमच्या सेवा : आमचे कार्यक्रम

बाह्यरुग्ण सेवा वेळापत्रक

सामान्य OPD

रोज सकाळी ९ ते दुपारी २
गुरुवार बंद

रविवार विशेष

उच्च रक्तदाब व शुगर विशेष ओपीडी

मंगळवार विशेष

गरोदर माता तपासणी विशेष ओपीडी

सामुदायिक आरोग्य उपक्रम

  • परिसरातील आकापुर, करोली, बोरमाळा टोली, डोंगरगांव, मेहा या गावात संस्थेकडून गावातील व्यक्तीची आरोग्य सोबती म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांमार्फत गावात मोफत ताप, सर्दी, खाज, उलटी, हगवण या आजारांचा प्राथमिक उपचार केल्या जातो.
  • आकस्मिक वेळी डॉक्टरांशी संपर्क साधून मोफत सल्ला व संदर्भ सेवा प्रदान केली जाते.
  • गर्भवती महिलांची व सहा महिने पर्यंतच्या बालकांची मासिक स्तरावर मोफत तपासणी होते.
  • गावातील वयोवृद्ध व गरजू ज्याना आणायला कोणी नाही याकरीत स्वस्त दरात ठराविक दिवशी गावातून
  • वाहन व्यवस्था उपलब्ध

विविध आरोग्य शिबिरे

  • नेत्र तपासणी व मोती बिंदू, काच बिंदू निदान शिबिर
  • स्वस्त दरात ऑपरेशन ची सुविधा
  • मोफत ऑपरेशन ची व नेण्या आणण्याची सुविधा
  • शल्य चिकीत्सक, स्रीरोग तज्ञ, मानसिक रोग तज्ञ यांची विशेष ओपीडी

किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

  •  वयात येणाऱ्या मुला व मुलींकरिता कार्यशाळा 
  •  शाळाबाह्य मुलांसाठी कार्यशाळा

क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

  • परिसरातील नागरिकांसाठी वर्षातून एकदा क्रीडामहोत्सव : कबड्डी , खो -खो, व्हॉली बॉल , गोळा फेक, म्याराथोन या खेळांची मेजवानी , लोकनृत्याचे सादरीकरण 
  • एक गाव एक संघ हि संकल्पना : गावातील प्रत्येकास  संधी मिळावी हा उद्देश्य
  • स्थानिक सहभागातून उपक्रम  
  • अविवाहित ( मुले व मुली ) तसेच विवाहित ( स्त्रीया व पुरुष ) वर्गासाठी विशेष प्रोत्साहन 
  • पारितोषिक म्हणून शैक्षणिक व गृहउपयोगी  वस्तू  
  • प्रत्येक सहभागी व्यक्तीस प्रमाणपत्र 

आमचे उपक्रम

जाणीव रुग्णालय : सर्वांचे आपले रुग्णालय

२४ तास उपलब्ध सेवा

स्थानिक भाषेतून संवाद

संवेदनशील कार्यकर्त्यांची टीम

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम

आधुनिक उपकरणे

स्थानिक परिस्थितीशी मेळ खाणारे दवाखान्यातील वातावरण

या प्रवासात तुम्हीही सहभागी होऊ शकता..

मागील पाच वर्षांपासून आपल्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळे आम्ही ग्रामीण भागात अखंड आरोग्य सेवा पुरवू शकत आहोत. तुमच्या सहभागातून मोठा बदल घडू शकतो.

आर्थिक देणगी

वैद्यकीय उपकरणे

स्वयंसेवक म्हणून सहभाग

आरोग्य शिबिरांचे आयोजन